(पाली)
पाली तलाठी सजाच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक दाखल्यांसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी दाखले काढून घेण्यासाठी अर्ज भरले असून त्याची छाननी करण्यात येऊन लवकरच दाखले वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या कॅम्पचे आयोजन पालकमंत्री उदय सामंत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उद्योजक रवींद्र सामंत, किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी वळके सरपंच उत्तम सावंत, साठरेचे माजी सरपंच वामन कांबळे, मंगेश पांचाळ,मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियदर्शिनी रावराणे,पाली महसूल मंडळ अधिकारी रमाकांत शिवलकर,पाली सजा तलाठी मीनाक्षी कदम, चरवेली सजा तलाठी स्वाती तारळेकर व रत्नागिरी सेतू टीमने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व तलाठी चौकशी अहवाल तात्काळ भरून देऊन सहकार्य केले.
या कॅम्पमुळे साठरे,बांबर,पाली, पाथरट, वळके, कापडगाव,चरवेली या गावातील विद्यार्थ्यांना पाली हायस्कूलमध्ये ऐकाच ठिकाणी उत्पन्न, जातीचा, नॉन क्रिमिलेयर,अधिवास यासारखे दाखले शासकीय दराने काढण्याची सोय गावातच कॅम्प आयोजित करून दिल्यामुळे पालकांचा वेळ व खर्च वाचल्यामुळे तलाठी मीनाक्षी कदम यांचे पालकांनी व प्रशालेने विशेष आभार मानले.