( खेड / इक्बाल जमादार )
तालुक्यातील संगलट येथील डॉ. अझर आदम नाडकर यांनी परदेशात अटकेपार झेंडा रोवत भारताचे नाव उंचावण्याची किमया केली आहे. दक्षिण आफ्रिका शासनाने त्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रीय वैद्यकीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
नाडकर यांचे लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. वडीलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने अपार कष्ट उपसत शिक्षणाच्या प्रवाहात आणले. यामुळे त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. दक्षिण आफ्रिकेतील कॅपटाऊन येथे त्यांचे अद्ययावत रूग्णालय आहे. या रूग्णालयाच्या माध्यमातून ते जनतेचे सेवा करत आहेत.
संगलट येथील सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार इकबाल जमादार यांचे डॉ. नाडकर भाचे आहेत. आपण भारतीय असल्याचा गौरव असून भारतीय लोक माझ्याकडे उपचारासाठी येतात. त्यांच्याकडे एक कुटुंबातील सदस्य म्हणून पाहतो, अशी प्रतिकिया डॉ. नाडकर यांनी व्यक्त केली.