(रत्नागिरी)
जे.एस.डब्ल्यू तर्फे पर्यावरण सप्ताहानिमित्त जयगड किल्ला येथे स्वच्छता करण्यात आली. कंपनी मार्फत दरवर्षी ५ जुन पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनांसाठी विविध उपक्रम केले जातात. यावर्षीही युनिट हेड पेड्डान्ना रामायनं यांच्या मार्गदशनाखाली पर्यावरण विभागामार्फत किल्ला स्वछता मोहीम, मालगुंड किनारा स्वछता मोहीम आदीचे आयोजन केले आहे.
या मोहिमध्ये जयगड सरपंच फरझाना डांगे, ग्रामपंचायत सदस्य, जे.एस. डब्ल्यू एनर्जी कंपनीचे एच आर हेड राजीव जोशी आणि कर्मचारी आणि कंत्राटदार व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. अशाच स्वच्छता मोहीमा राबविण्यात याव्यात असे त्यांनी यावेळी आवाहन केले. याप्रसंगी प्लॅस्टिकच्या बॉटल्स एकत्र करण्यासाठी कायमस्वरूपी एक कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. सदरची कचराकुंडी सरपंच जयगड फरझाना डांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. पर्यटकांनी प्लास्टिक बॉटल्स इतरत्र न टाकता कचरा कुंडीचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी काचेच्या बॉटल्स ,प्लास्टिक बॉटल्स आणि प्ल्यास्टिक असा एक ट्रॅक्टर कचरा जमा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जे.एस.डब्ल्यू एनर्जी च्या पर्यावरण विभागामार्फत करण्यात आला होते