(नवी दिल्ली)
भारताने गुरुवारी अग्नी-१ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूकतेने लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने (एसएफसी) ओडिशातील अब्दुल कलाम बेटावरून क्षेपणास्त्र सोडले. मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-१ चे प्रशिक्षण प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले.
निवेदनात म्हटले आहे की, क्षेपणास्त्राची यंत्रणा व्यवस्थित रित्या काम करत होती. क्षेपणास्त्राने आपल्या लक्ष्यावर अचूक मारा केला. प्रशिक्षण प्रक्षेपण दरम्यान, क्षेपणास्त्राने सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबींची पूर्तता केली आहे. गेल्या दोन दशकांपासून भारताने अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. भारताने आतापर्यंत अग्नी क्षेपणास्त्रांच्या अनेक मालिका विकसित केल्या आहेत.