(लांजा)
लांजा शहरातील बाजारपेठेत एक व्यक्ती मुंबई मटका जुगार खेळत असल्याची माहिती लांजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका दुकानाच्या पाठीमागे धाड टाकून पोलिसांनी मुंबई मटका जुगार खेळविणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत ११२९ रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
गणेश शामू साळुंखे (वय ४५ राहणार बेनी खुर्द तेलेवाडी, ता. लांजा) या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. स्वतःच्या फायद्यासाठी मुंबई मटका जुगार खेळविल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ११२९ रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. यामध्ये रोख रक्कम आणि जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.