(खेड)
तालुक्यातील खाडीपट्ट्यातील सुसेरी नंबर १ मधील बौद्धवाडीतील ३२ वर्षीय तुषार सुनिल शिर्के याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २६ मे २०२३ रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८.४५ वाजता या तरुणाचा मृत्यू गुरांच्या गोठ्यात आढळून आला. या प्रकरणी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुसेरी नंबर १ मधील बौद्धवाडीतील गुरांच्या गोठ्यात तुषार शिर्के हा तरुण कपडे काढलेल्या व मृतावस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी कळंबणी बुद्रुक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.