(रत्नागिरी)
उर्दू शिक्षणाच्या प्रसारासाठी अहोरात्र मेहनत घेणारे शिक्षक अब्दुल रेहमान कुरेशी आज आपली सेवा पूर्ण करून वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. कुरेशी सर यांनी उर्दू भाषेच्या प्रसारासाठी खूप मेहनत घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अल्पसंख्यांक साधन गटाची धुरा सांभाळून उर्दू शाळांसाठी अनेक योजना आणून शैक्षणिक विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेऊन उर्दू शिक्षक संघटनेची धुरा ही त्यांच्या हाती देण्यात आली.
मैत्रीसाठी जीवास जीव देणारा, अन्याया विरुद्ध नेहमी बुलंद आवाज उठविणारा शिक्षक म्हणजे कुरेशी सर अशी त्यांची ख्याती होती. आज वयोमानानुसार आपली सेवा उत्तम प्रकारे बजावून सेवानिवृत्त होत आहेत. सुट्टीच्या कालावधीतही या कर्तबगार शिक्षकास समाजातील बहुसंख्य संस्थाकडून तसेच अनेक शिक्षकांकडून भावपूर्ण निरोप दिला जात आहे.