(रत्नागिरी)
तालुक्यातील निवेंडी येथे बाथरुममध्ये पाय घसरून पडलेल्या वृद्धेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना २८ मे रोजी घडली आहे. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
प्रमिला प्रभाकर जाधव (६६, रा. निवेंडी भगवतीनगर, रत्नागिरी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. रविवारी सकाळी प्रमिला जाधव बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने बेशुध्द झाल्या होत्या. त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना प्रथम मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेवून अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना प्रमिला जाधव यांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.