(देवरुख /सुरेश सप्रे)
विद्यार्थी वर्गाने आपल्या हाती असलेल्या नवीन तंञज्ञानाचा उपयोग करुन प्रगती करून स्वावलंबी बनुन देशाचे आर्दश नागरीक बना, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख व उद्योजक सुरेश कदम यांनी केले. संगमेश्वर तालुका उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, देवरुख शहर शिवसेनेच्या वतीने बारावी परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नक्षत्र सभागृह खालची आळी देवरूख येथे करण्यात आयोजित करणेत आला होता. त्यावेळी सुरेश कदम बोलत होते. यावेळी व्यापीठावर सोसायटीेचे अध्यक्ष संतोष लाड, काँग्रेसचे अनिल भुवड,राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सेना नगरसेवक वैभव पवार, प्रकाश उर्फ बाबु मोरे, माजी सभापती बंड्या बोरुकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्याला ज्या विषयाची आवड आहे त्यातच करियर करावे. मिञ मैञिणीनी क्षेञ निवडले म्हणुन मी पण निवडले असे करु नये. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करा. नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक बनुन अनेकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करा, असा मोलाचा सल्लाही कदम यांनी दिला.
प्रारंभी छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख म्हणून उद्योजक सुरेश कदम यांची निवड झाल्याने त्यांचा शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. माजी सभापती अजित उर्फ छोट्या गवाणकर यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला.गुणवंतांचा सन्मान झाल्यावर मुलांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
शिवसेनेतर्फे कायम विद्यार्थी वर्गाचा सन्मान करुन त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.. मुलांनी पालकांनी आपल्याला घडवले याची जाणीव ठेवून आपले लक्ष साध्य करावे असे आवाहन विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष लाड यांनी केले. युवासेनेचे अजित गवाणकर यांचे पुढाकाराने आयोजित या उपक्रमाचे विद्यार्थी व पालक यांनी कौतुक केले.
या सोहळ्यासाठी दादा शिंदे,अमर गवाणकर, तेजस भाटकर, यश सुर्वे, दर्शन भाटकर, अमोल चाळके, संकेत नार्वेकर, दिपक भेरे यांचे योगदान लाभले.