(लांजा)
मौजे गवाणे बौद्धजन उत्कर्ष मंडळ मुंबई आणि बौध्दजन सेवा संघ गवाणे व माता रमाई महिला मंडळ गवाणे आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘संयुक्त जयंती महोत्सव’ प्रबुद्ध बुद्ध विहार मौजे गवाणे येथे उत्साहात संपन्न झाला.
जयंतीच्या महोत्सवा निमित्त मुंबई संघटनेकडून वयोवृद्धांना वस्तुस्वरुपी मदत करण्यात आली. सकाळच्या सत्रात धम्म ध्वजारोहन जेष्ठ सदस्य बाबू काशिराम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बौद्धाचार्य दिनेश कांबळे यांच्या समवेत सामूहिक पद्धतीने बुद्ध पूजापाठ घेण्यात आला. सायंकाळी ४ वाजता भव्य धम्म रॅली काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कला,क्रिडा, शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष अवि शांताराम कांबळे यांच्या मार्गर्शनाखाली रात्री जाहिर सभा होऊन सत्कार, समारंभाचा कार्यक्रम पार पडला.यामध्ये विजेत्यांना पारितोषिक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच नृत्य अविष्कार सादरीकरण करण्यात आले.
यावेळी ग्रामीण अध्यक्ष दत्ताराम अर्जुन कांबळे, महिला अध्यक्षा संगिता कांबळे यांच्यासह कार्यकारणी सदस्य आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण आणि आजी माजी पदाधिकारी, मुंबई कार्यकारिणी व तरुण मंडळ ग्रामीण, व महिला मंडळ यांचे योगदान लाभले.