(लांजा / जगदीश कदम)
लांजा तालुका बारावी परीक्षेचा निकाल ९६.४६ टक्के इतका लागला. लांजा कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसिका रमाकांत पांचाळ ९०.८३ गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर साक्षी सुनील गुरव ९०.५० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
लांजा तालुक्यातून १०४७ विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते. यापैकी १०१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ५९ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्यश्रेणी, २३२ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, ५२६ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर १९३ विद्यार्थ्यांना पास श्रेणी प्राप्त झाली. तालुक्यातील ९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल खालील प्रमाणे आहे.
लांजा न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय
या महाविद्यालयाचा निकाल ९६.०३ टक्के इतका लागला. यामध्ये कला शाखेचा ८७.०६ टक्के वाणिज्य शाखेचा ९८.५५ टक्के तर विज्ञान शाखेचा ९७.८६ टक्के इतका निकाल लागला. एकूण ५८० विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
यामध्ये कला शाखा – प्रज्योती अर्जुन पालये ८१.५० टक्के प्रथम, सिध्दी राजेंद्र कांबळे ७९.५० द्वितीय, सलोनी दिलीप गांगरकर ७८.८३ तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखेत रसिका रमाकांत पांचाळ ९०.८३ टक्के गुणांसह प्रथम, साक्षी सुनील गुरव ९०.५० टक्के गुणांसह द्वितीय, श्रावणी राजेंद्र देवरुखकर ८९.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत हर्षद सुभाष दुडये ८५.१७% गुणांसह प्रथम श्रुती संतोष जाधव ८०.६७ गुणांसह द्वितीय तर सानिया शरीफ लांजेकर ७५.३३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
रा. सी. बेर्डे विद्यालय व कै. श्रुतिका यदुनाथ बेर्डे कनिष्ठ महाविद्यालय साटवली
विज्ञान शाखेचा निकाल ९६.८२ टक्के इतका लागला. एकूण ६३ पैकी ६१ विद्यार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये
प्रथम अक्सा कोंडकरी ६२.५० टक्के गुणांसह प्रथम, विवेक बापेरकर ६२.३३ गुणांसह द्वितीय, तर दिक्षा पांचाळ हिने ६० टक्के गुणांनी तृतीय क्रमांक पटकावला.
प्रतापराव माने विद्यालय व सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय भांबेड
या ज्युनियर कॉलेजच्या कला शाखेत ५० विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ९० टक्के इतका लागला. यामध्ये कला शाखेत अस्मिता सुनील मोसमकर ७२.३३ टक्क्यांसह प्रथम, साक्षी रमेश दैत ७०.३३ टक्क्यांसह द्वितीय, तर प्रसाद राजेंद्र पांचाळ ६३.८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेला ५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या शाखेचा निकाल १०० टक्के इतका लागला. यामध्ये तेजस सुरेंद्र गोसावी ८२ टक्के गुणांसह प्रथम, उदय अनंत डोंगरे ७६.६७ गुणांसह द्वितीय, तर अक्षदा सुनील इंदुलकर ७५.६७ गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
न्या. व्ही.व्ही.आठल्ये विद्यामंदिर शिपोशी
या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९४.३१ टक्के इतका लागला. यामध्ये कला शाखेत नीती प्रमोद जाधव ६० टक्के गुणांसह प्रथम, नंदिनी शंकर सकपाळ ५४.३३ गुणांसह द्वितीय, साक्षी सिद्धार्थ जाधव ५३.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखा (मराठी माध्यम) श्वेता प्रकाश रेवाळे ७० टक्के गुणांसह प्रथम, शलाका प्रवीण सावंत ६८.५०% गुणांसह द्वितीय, जयदीप दीपक म्हेतर ६८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखा (इंग्रजी माध्यम) श्रमण श्रीकांत जाधव ८६.८३ टक्के गुणांसह प्रथम, वृषाली शशिकांत सोयने ६६.१७% गुणांसह द्वितीय, पूजा अंकुश देवळेकर ६५.३३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
दरम्यान लांजातील विद्यादीप कनिष्ठ महाविद्यालय आणि सापुचेतळे येथील रा.सी.बेर्डे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. बॅरिस्टर नाथ पै कनिष्ठ महाविद्यालय हर्चेचा निकाल ९८.५९ टक्के लागला. श्रीराम विद्यालय तु पुं शेट्ये जुनिअर कॉलेज वेरवली बुद्रुक या महाविद्यालयाचा निकाल ९६.५५ टक्के इतका लागला. तर रिंगणे येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकमेव असलेल्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के इतका लागला.