(चिपळूण)
तालुक्यातील वालोपे- पेढे वाशिष्ठी नदी किनारी तसेच चिंचघरी येथे गावठी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व चिपळूण पोलिसांनी केलेल्या संयुक्त धडक कारवाईत सुमारे ४ हजार ७०० लिटर रसायन व २०६ लिटर दारू असा १ लाख ३५ हजार २४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून रसायन व इतर साहित्य जागीच नष्ट करण्यात आले आहे. ही संयुक्त कारवाई बुधवारी करण्यात आली.
डॉ. बी. एच. तडवी, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापुर तसेच श्री. सागर. क. धोमकर जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली दि. २३ मे रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभाग व पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे चिपळूण यांचेकडील पोलिस अधिकारी व स्टाफ यांचे समवेत संयुक्तपणे सदर कारवाई करण्यात आली. वालोपे व पेढे ता. चिपळूण या परिसरात वाशिष्टी नदीकिनारी अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर व चिंचघरी येथे हातभट्टी गावठी दारू विक्री केंद्रावर अशा एकूण चार ठिकाणी छापे टाकून सुमारे ४ हजार ७०० ली. रसायन व हातभट्टी गावठी दारू २०६ ली. असा एकूण १ लाख ३५ हजार २६० रुपये किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्धेमाल जप्त करण्यात आला. यावेळी रसायन व इतर साहित्य जागीच नाश करण्यात येऊन याप्रकरणी महेश नंदकुमार नागवेकर, मंदार मधुकर दिवेकर, मनोज दशरथ बुरटे, आशीष सुधाकर चाळके अशा चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ई) (फ) अन्वये गुन्हे नोंद करणेत आले आहेत.
सदर हातभट्टी निर्मिती करणाऱ्या मुख्य सूत्रधाराची कसुन चौकशी करण्यात येत आहे. सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाचे निरीक्षक श्री. व्ही. एस. मासमार तसेच दु. निरीक्षक चिपळूण क्र. 1, श्री.जे.एस. खुटावळे, श्री. जी. एस. नाईक, दुय्यम निरीक्षक चिपळूण क्र.02, श्री. एम.बी.पाटील पोलिस उप निरीक्षक श्री. मनीष कांबळे, पोलिस सहा. दु. निरीक्षक, श्री. आर. बी. भालेकर, दु. निरीक्षक, श्री. एस. एन. वड जवान ब. क्र. 18 यांनी भाग घेऊन कामगिरी बजावली.
सदर गुन्हयाबाबत अधिक तपास निरीक्षक श्री. व्ही. एस. मासमार आणि दुय्यम निरीक्षक चिपळूण क्र.01 चे श्री. जे.एस. खुटावळे करीत आहेत.