(डिजि टेक)
स्मार्टफोन आज लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. लोकांना स्मार्टफोनशिवाय जगणे कठीण झाले आहे. आजकाल लोक कोणत्याही स्थितीत स्मार्टफोन स्वतःहून बाजूला ठेवू इच्छित नाहीत. ओप्पो आणि काउंटरपॉईंटने स्मार्टफोनच्या या व्यसनावर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाला ‘नोमोफोबिया’ असे नाव देण्यात आले. दिवसभरात मोबाईलवर एकही फोन आला नाही तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं का? तुम्ही वारंवार स्वत:चा मोबाईल चेक करता का? फोन सापडत नसल्यास तुम्ही वेडेपिसे होता का? फोनशिवाय जगता येणार नाही असं तुम्हाला वाटत का?… या साऱ्या प्रश्नांचं उत्तर ‘हो’ असं असेल तर आपण ‘नोमोफोबिया’ या आजाराचे शिकार झाला आहात. ‘नो-मो फोबिया’ म्हणजेच आपल्याकडे मोबाइल नसण्याची भीती!
फोनपासून दूर राहण्याची नेहमी भीती
सर्वेक्षणानुसार, 65 टक्के वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनशी भावनिकरित्या जोडलेले आहेत. इंटरनेट तर संपणार नाही ना ? फोन तर हरवणार नाही ना? बॅटरी संपणार तर नाही? अशी भीती त्यांना नेहमी वाटत असते. नोमोफोबिया नो मोबाईल फोबियासाठी लहान आहे. ही एक प्रकारची भीती आहे ज्यामध्ये लोक घाबरतात की मोबाइल काम करत नाही. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 60 टक्के लोकांनी मान्य केले की ते खराब बॅटरीमुळे ते कायम त्रस्त असतात.
महिलांपेक्षा पुरुषांना मोबाईलची जास्त काळजी
या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, महिलांपेक्षा पुरुषांना मोबाईलची जास्त काळजी वाटते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 82 टक्के पुरुषांनी हे मान्य केले की त्यांना फोनबाबत जास्त टेन्शन आहे, तर 74 टक्के महिलांनी सांगितले की त्यांना फोनची बॅटरी आणि इंटरनेटची काळजी वाटते. सर्वेक्षणात सहभागी 92.5 टक्के लोकांनी सांगितले की ते पॉवर सेव्हिंग मोड वापरतात आणि 87 टक्के लोक म्हणाले की ते त्यांचा फोन पूर्णपणे चार्ज झाल्यावरच वापरतात.
42 टक्के वापरकर्ते मनोरंजनासाठी फोन वापरतात
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 42 टक्के लोकांनी हे मान्य केले की ते मनोरंजनासाठी त्यांचा फोन वापरतात आणि मनोरंजनासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. सुमारे 65 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना बॅटरी वाचवण्यासाठी अनेक वेळा फोन वापरणे बंद करावे लागते.
सर्वेक्षणाचे निष्कर्ष
- आपला स्मार्टफोन थोडा वेळ जरी आपल्याबरोबर नसला तर आपल्याला मानसिक त्रास होतो असे मत ३० वर्षांखालील तरुणांनी नोंदवले.
- दर पाच लोकांपैकी एकजण गाडी चालवताना मोबाईलवरून मेसेज करतो; त्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. अनेकजण गाडी चालवताना मोबाईलवरून मेसेज पाठविण्याच्या सवयीला बळी पडलेले आहेत.
- अनेक तरुण मुले टेक्स्ट मेसेज, ई-मेल आणि सोशल नेटवर्कींग अकाउंट पाहण्यासाठी दर दहा मिनिटांनी एकदा आपला मोबाईल तपासून पाहतात. झोपेचे आठ तास वगळल्यास एक सामान्य तरुण दिवसभरात ९६ वेळा आपला मोबाईल तपासून पाहतो. त्यात काही अडथळा आला किंवा त्याने दहा मिनिटांहून अधिक वेळ मोबाईल तपासला मिळाला नाही तर त्यांना अस्वस्थ वाटू लागते.
मोबाईलच्या अतिवापराचे हे आहेत तोटे
फोनच्या वापरामुळे तुमचा वेळ वाया जातो.
वागण्या-बोलण्यामध्ये अस्वस्थता येऊ लागते.
फोनच्या अतिरेकी वापरामुळे झोप कमी येते.
मोबाईल फोनचा बराच वेळ वापर केल्यानंतर मान दुखणं सुरु होते.
डोळे कोरडे होणं, कंम्प्यूटर व्हिजन सिंड्रोम आणि अनिद्रेचं कारण बनतात.