(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गणपतीपुळे क्लबच्या दोन खेळाडूंची जागतिक ब्लॅकबेल्ट परीक्षेसाठी निवड झाली आहे. वर्ल्ड तायकोंदो फेडरेशन ऑफ इंडिया, तायकोंदो असोशिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने व रत्नागिरी तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यावतीने दिनांक 21 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल रत्नागिरी येथे जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षा तायकोंदो असोशिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अविनाश बरगजे, सचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, टेक्निकल प्रमुख प्रवीण बोरसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून 400 खेळाडू सहभागी होणार असून या परीक्षेसाठी तायकोंदो मार्शल आर्ट स्पोर्ट्स सेंटर मालगुंड गणपतीपुळे क्लब मधील खेळाडू कादंबरी चौधरी व अनय घनवटकर या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक रुपेश तावडे, जिल्हा प्रमुख प्रशिक्षक लक्ष्मण कररा यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहित मयेकर, राज देवरुखकर, किशोर गुरव, सूरज पवार, श्रीदेव संस्थान गणपतीपुळे चे अध्यक्ष विनायक राऊत, मालगुंड एजुकेशन सोसायटीचे चेअरमन बंधू मयेकर, आबा पाटील रत्नागिरी तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, राम कररा, विनोद माने, विजय भिडे, तसेच चंडिका ट्रस्ट गणपतीपुळे च्या सर्व संचालक व सभासदांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.