(लांजा)
दारूच्या नशेत ४३ वर्षे व्यक्तीने घरातील किचन रूममधील लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कोट नारकरवाडी येथे मध्यरात्री घडली आहे. २१ मे रोजी रात्री १.३० ते पहाटे ५.३० या कालावधीत ही घटना घडली आहे.
या बाबतची खबर सुवर्णा संतोष नारकर (४० वर्षे रा. कोट नारकरवाडी) यांनी लांजा पोलीसांना दिली आहे. संतोष सुरेश नारकर (४३) वर्षे यांनी दि. २१ मे रोजी रात्री पहाटेच्या सुमारास दारूच्या नशेत घरातील किचन रूममधील लोखंडी अँगलला नायरल दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.
पत्नी सुवर्णा नारकर या सकाळी उठल्यावर ही गोष्ट लक्षात आली. या बाबत त्यांनी लांजा पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भुजबळराव हे करत आहे.