(रत्नागिरी)
देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे रत्नागिरी येथील शोरुम मध्ये शानदार कार्यक्रमा मध्ये हॅरीअर रेड डार्क एडिशन चे अनावरण आणि प्रथम वाहनाचे वितरण महारष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सिंधुरत्न समृद्धी योजना चे सदस्य श्री.किरण उर्फ भैया सामंत यांचे हस्ते करण्यात आले.
टाटा मोटर्स पुरस्कृत आय. पी. एल. ट्वेन्टी – ट्वेन्टी स्पर्धा सुरू असताना सदर वाहन टाटा मोटर्स तर्फे प्रस्तुत करण्यात आल्याने ग्राहका मध्ये या एडीशन बद्दल विशेष आकर्षण दिसून येत आहे. संपूर्ण स्वदेशी अभियान अंतर्गत टाटा मोटर्सच्या वाहनांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे. ग्राहकांचा अतिरिक्त लाभ करणेचे दृष्टीने एस.पी. ऑटोहब ने स्पिन अँड विन योजना देखील उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत विविध आकर्षक बक्षीस उपलब्ध करून दिली आहेत.
एस.पी. ग्रूप ने गोवा, गुजरात,राजस्थान येथील अभूतपूर्व अशा यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा द्वारे प्रवेश केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स आणि सर्व्हिस ने परिपूर्ण असे रत्नागिरीतील सर्वात मोठे असे वातानुकूलित शोरुम ग्राहकांच्या सेवे करिता उपलब्ध करून दिले आहे.
टाटा कार श्रेणी अंतर्गत येणाऱ्या टियागो टिगोर पेट्रोल आणि सी.एन.जी. नेक्सोन पेट्रोल आणि डिझेल पुंच, अल्त्रोझ, सफारी ७ सीटर, हॅरीअर ही सर्व वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नुकतीच टाटा ने अलत्रोझ ही प्रीमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये येणारी कार ट्वीन सिलेंडर सी.एन.जी.मध्ये उपलब्ध करून दिली असल्याने सदर कार चे बुकिंग ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्रसंगी नगरसेवक श्री. निमेश नायर, उद्योगपती श्री.संदीप मगदूम, श्री.मुन्ना शेठ देसाई श्री.कल्पेश जाधव ई.मान्यवर उपस्थित होते. ग्राहकांनी अधिक माहिती करिता आमचे नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कार च्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.