(पुणे)
पुण्यातील उंड्री चौकात विचित्र भीषण अपघात झाला आहे. एका ट्रॅव्हल्स बसची पाच ते सहा गाड्यांना धडक बसली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले आहेत. पुण्यातील एनआयबीएम रोडजवळील इशरत बागमधील तीव्र उतारावर बसचे ब्रेक फेल झाल्याने बसने ५ ते ६ वाहनांना धडक दिली. ही घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे कोंढवा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पुण्यातील कोंढवा भागातील उंड्री परिसरातून एक बस पुढे निघाली होती. द टाइम ट्रव्हल कंपनी हि बस होती. अचानक या बसचे ब्रेक फेल झाल्याने बसने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे समोर पाच ते सहा गाड्यांना धडक बसली. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा वर्दळीचा भाग आहे. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. काही गाड्या पलटी झाल्या. एनआयबीएम ते कडनगर या रोडवरती ऑर्चिड पॅलेस समोर हा अपघात झाला.
तीव्र उतारावर मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेचे वृत्त समजताच कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल होत अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या दुर्घटनेत अनेक गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यामध्ये एक रिक्षा उलटली तर फुटपाथवरील काही दुकानांचेही नुकसान झाले आहे.
Post Views: 3,198