(मुंबई)
ट्विटरचे ब्लू टिक मिळालेले यूजर्स आता ट्विटरवर 2 तासांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करू शकतील. ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विट करून या नव्या फीचरची माहिती दिली आहे. मात्र, यूजर्स कमाल 8 जीबीपर्यंतच व्हिडिओ अपलोड करू शकतात. यापूर्वी, हे यूजर्स ट्विटरवर 1 तासाचे (जास्तीत जास्त 2 जीबी) पर्यंतचे व्हिडिओ अपलोड करू शकत होते.
ब्लू सबस्क्रिप्शन आवश्यक
सामान्य ट्विटर युजर्स (ब्लू टिक नसलेले सदस्य) हे वैशिष्ट्य वापरू शकणार नाहीत. ट्विटरवर दोन तासांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड आणि शेअर करायचा असेल त्याला ट्विटरचे मासिक ब्लू सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. नॉन-ब्लू टिक सदस्य सध्या फक्त 140 सेकंद (2 मिनिटे 20 सेकंद) पर्यंतचे व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करू शकतात.
ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत
ब्लू सबस्क्रिप्शन सेवेची किंमत भारतातील Android आणि iOS मोबाइल वापरकर्त्यांसाठी दरमहा 900 रुपये आहे. वेब वापरकर्ते 650 रुपये प्रति महिना ब्लू सबस्क्रिप्शन सेवा घेऊ शकतात. मस्क यांना 2023 च्या अखेरीपर्यंत ट्विटरला आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे आहे. महसूल वाढवण्यासाठी त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शन सेवेत बदल केले आहेत.
अक्षर मर्यादा वाढवली
ट्विटरने गेल्या महिन्यात अक्षर मर्यादा 280 वरून 10,000 पर्यंत वाढवली. म्हणजेच तुम्ही इथे कोणताही अडथळा न येता संपूर्ण लेख लिहू शकता. एवढेच नाही तर आता ट्विटरवर बोल्ड आणि इटालिक असे टेक्स्ट फॉरमॅटिंग देखील वापरता येणार आहे. ट्विटरने कमाईचे मोनेटाइजेशन फीचर देखील सादर केले. ट्विटरने 2021 पासून ‘सुपर फॉलो’ पर्यायाला ‘सबस्क्रिप्शन’ असे नाव दिले आहे. यामध्ये यूजर्स अन कंटेंटसाठी लोकांकडून प्रति महिना 3 डाॅलर, 5 डाॅलर आणि 10 डाॅलर चार्ज करू शकतात.
ब्लू टिक व्हेरिफाईड सब्सक्राईबर्ससाठी विशेष वैशिष्ट्ये
– ट्विट केल्यानंतर तुम्ही 30 मिनिटांत 5 वेळा पोस्ट संपादित करू शकता.
– केवळ ब्लू सबस्क्रिप्शन असलेले ट्विटरद्वारे पैसे कमवू शकतात.
– यूजर्स 10 हजार रुपयांपर्यंत ट्विट करू शकतात.