(संगमेश्वर)
संगमेश्वर बाजारपेठेतील गटाराचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे संगमेश्वरमध्ये गटार तुंबण्याची मोठी समस्या सुटणार आहे. संगमेश्वर बाजारपेठ ही मध्यवर्ती बाजारपेठ असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ग्राहक खरेदीसाठी येतात. गेली अनेक वर्षे संगमेश्वर बाजारपेठेमध्ये गटारांची समस्या आहे.
पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई केली तरी अनेकवेळा गटारे तुंबण्याची समस्या कायम असते. यावर उपाययोजना म्हणून संगमेश्वर बाजारपेठेमधील तुंबणारे गटार अखेर साफ होण्यासाठी गटाराचे काम सुरू करण्यात आले आहे. संगमेश्वर बाजारपेठेला जाणाऱ्या रस्त्यावरच हे गटार असल्याने बाजारपेठेमधील वाहतूक रामपेठमार्गे वळवण्यात आली आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकीसाठी हा मार्ग एका बाजूने बंद करण्यात आला आहे.