(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावर कामथे उपजिल्हा रुग्णालयाजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव एसटी बसची धडक बसून झालेल्या अपघातात ७७ वर्षीय वृद्ध ठार झाला आहे. दशरथ बाळकृष्ण भेंडखळे (रा. पेठमाप, चिपळूण) असे मृताचे नाव आहे. हा अपघात दि. १५ मे रोजी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
दशरथ भेंडखळे हे कामथे उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्ता ओलांडत असताना कोसबी मुंढे ते चिपळूण अशी एसटी चालक प्रवीण पुरुषोत्तम कदम हे भरधाव वेगाने चालवित असताना कामथे उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्ता ओलांडणारे दशरथ भेंडखळे यांना एसटी बसची धडक बसली व त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.