(रत्नागिरी)
बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या टँकरला धडक देत अपघात केला. या प्रकरणी दुचाकी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शनिवार १३ मे रोजी सकाळी १०.४५ वा. निवेंडी फाटा येथे घडली आहे. तुषार सिध्दार्थ कांबळे (रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
तुषार आपल्या ताब्यातील सुझुकी ॲक्सेसवरुन जयगड ते निवळी असा आपल्या घरी जात होता. तो निवेंडी फाट्याच्याजवळी उतारातील वळणात आला असता, समोरुन येणाऱ्या गॅस टँकरला त्याने रस्त्याच्या मध्यभागी जात धडक दिली. या अपघातात तुषारला दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात तुषार विरोधात भा. दं. वि. कायदा कलम २७९, ३३७, ३३८ आणि मोटार वाहना कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.