(नवी दिल्ली)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची कमान आता महिलेच्या हाती असेल. अब्जाधीश उद्योगपती आणि ट्विटरचे नवीन मालक एलोन मस्क यांनी लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून नियुक्तीची घोषणा केली. मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली की, ‘ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो यांचे स्वागत करताना मी उत्साहित आहे!’, त्यांनी सांगितले की लिंडा प्लॅटफॉर्मच्या व्यवसाय ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करतील. तर मस्क हे उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित काम हाताळतील.
लिंडा याकारिनो या 2011 मध्ये केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्रीचे अध्यक्ष म्हणून NBCUniversal मध्ये सामील झाल्या. एका वर्षानंतर त्यांची जाहिरात आणि ग्राहक भागीदारी अध्यक्ष म्हणून पदोन्नती झाली. जाहिरात आणि ग्राहक भागीदारीचे अध्यक्ष असताना वैयक्तिक नेटवर्क टीम्सला एकत्र आणत आणि NBC प्रॉपर्टीमधूल दुवा म्हणून काम करून संस्थेच्या जाहिराती आणि भागीदारींमध्ये परिवर्तन करण्याचे श्रेय Yacarino यांना जाते.
NBCUniversal मध्ये सामील होण्यापूर्वी, Yaccarino यांनी टर्नर एंटरटेनमेंट अॅडव्हर्टायझिंग सेल्स अँड मार्केटिंग अँड एक्विझिशनचे कार्यकारी VP आणि COO म्हणून 19 वर्षे काम केले. Yaccarino यांनी कॉमकास्ट कॉर्पोरेशनच्या (Comcast Corp entertainment) मनोरंजन आणि मीडिया विभागाच्या जाहिरात व्यवसायाचे आधुनिकीकरण केले. त्यांनी पेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये टेलिकम्युनिकेशन्सचा अभ्यास केला आणि सध्या स्कूल ऑफ कम्युनिकेशन्सच्या मंडळातील सदस्य आहेत.