(रत्नागिरी)
ओएलएक्स ऍपच्या जाहीरातीतील फ्लॅट भाड्याने घेण्याच्या बहाण्याने फ्लॅट मालकाला 80 हजाराचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल़ा ही घटना 12 मे 2023 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडल़ी स्वप्नील बाळासाहेब येलुरकर (38, ऱा जागुष्टे कॉलनी, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तकारदार यांनी आपले घर भाड्याने देण्यासाठी ओएलएक्स वर जाहीरात टाकली होत़ी ही जाहीरात वाचून दीपक पवार नावाच्या इसमाने तकारदार यांना फोन केल़ा तुमचा फ्लॅट मला आवडला असून तो फ्लॅट घेण्यास मी इच्छुक आहे अशी बतावणी केल़ी त्यासाठी गुगल पे करण्याच्या बहाण्याने तकारदार यांच्या खात्यामधील 16 हजार व नंतर 48 हजार असे एकूण 80 हजार रूपये काढून घेतल़े.
दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तकारदार यांनी शहर पोलिसांत तकार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी दीपक पवार याच्याविरूद्ध भादंवि कलम 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल केल़ा पोलिसांकडून वारंवार आपले बँक डिटेल्स अन्य कोणालाही पाठवू नका असे सातत्याने आवाहन करण्यात येत असत़े. असे असतानाही बँक डिटेल्स व खात्याबाबत इतर माहिती अनोळखी व्यक्तिंकडे उघड केली जात़े. यामुळे अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याचे समोर आल़े आहे.