(जयपूर)
आरसीबीने राजस्थानवर ११२ धावांसह दणदणीत विजय साकारला आणि त्यामुळेच गुणतालिकेत आता मोठा बदल झाला आहे. आरसीबीने राजस्थानपुढे विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण आरसीबीने राजस्थानचा अवघ्या ५९ धावांत धुव्वा उडवला आणि ११२ धावांनी विजय साकारला. या विजयासह गुणतालिकेत आता मोठा बदल झाला आहे.
यापूर्वी आरसीबीचे ११ सामने झाले होते. यात आरसीबीच्या संघाने पाच सामने जिंकले होते तर ६ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आरसीबीच्या संघाने पाच विजयांसह १० गुण पटकावले होते. त्यामुळे हा संघ सातव्या स्थानावर होता.
दुसरीकडे राजस्थानच्या संघाने या सामन्यापूर्वी १२ सामने खेळले होते. या १२ सामन्यांत राजस्थानने ६ सामने जिंकले होते तर सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे सहा सामन्यांतील विजयासह त्यांच्या खात्यात १२ गुण होते. त्यामुळे १२ गुणांसह राजस्थानचा संघ पाचव्या स्थानावर होता. हा सामना जिंकेल त्यांना दोन गुण मिळणार होते आणि या दोन गुणांसह गुणतालिकेत मोठा बदल असून आता आरसीबीने १२ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे.
गुणतालिकेत, पहिल्या क्रमांकावर गुजरात टायटन्स आहे. हा संघ प्लेऑफमध्ये जवळपास दाखल झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स आहे. त्यांचे १३ सामन्यात१ १५ गुण आहेत. त्यांचा नेट रनरेट +०.४९३ इतका आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहेत. त्यांचे १२ सामन्यात १४ गुण आहेत. त्यांचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. मुंबईचा नेट रनरेट -०.११७ इतका आहे. चौथ्या क्रमांकावर लखनौचा संघ आहे. त्यांचे १२ सामन्यात १३ गुण आहेत. त्यांचेही दोन सामने शिल्लक आहेत तर त्यांचा नेट रनरेट +०.३०९ इतका आहे.
पाचव्या क्रमांकावर आरसीबी आहे. आरसीबीचे १२ सामन्यात गुण असून त्यांचेही दोन सामने शिल्लक आहेत. त्यांचा नेट रनरेट +०.१६६ इतका आहे. आरसीबीला पुढचे दोन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे.