(रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी पुलाजवळ एसटी चालक व वाहकाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या 5 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल़ी. मारहाणीची घटना 10 सप्टेंबर 2013 रोजी घडली होत़ी. चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार संगमेश्वर पोलिसांनी संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला होत़ा तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होत़े.
रमेश सिताराम काळंबे (26, रा. राजीवली संगमेश्वर), प्रवीण वासुदेव पेढामकर (21, रा. कुटरे, खैरेवाडी चिपळूण) गणेश दत्ताराम कदम (21, रा. धामणदेवी, रायगड), स्वप्निल सुनिल कदम (20,रा. कुटरे खैरेवाडी, चिपळूण) आणि शैलेश सुभाष पंदेरे (22, रा. पुणे) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत़.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बिले यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा. खटल्यातील तक्रारदार एसटी बस चालक शरद सिताराम जाधव यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 10 सप्टेंबर 2013 रोजी दुपारी 3.30 वा.ते देवरुख आगारातून पाचांबे येडगेवाडी अशी मुक्कामी जाणाऱ्या बसमधून प्रवाशी घेउन जात होते.सायंकाळी 5.45 वा.त्यांची बस गड नदीचा पूल ओलांडून तिसंगी फाट्याकडील नवीन पुलावर पोहचली असता त्याठिकाणी चिपळूण रातांबी ही अन्य एक बस उभी दिसली.शरद जाधव यांनी आपल्या बसमधून उतरुन पाहिले असता त्यांना पाचजण आपल्या दुचाकी रस्त्यावर आडव्या लावून दारु पित असताना दिसून आले. शरद जाधव पुन्हा बसमध्ये येउन बसले. दरम्यान, चिपळूण रातांबी बसचे चालक स्वप्निल सुर्वेंनी त्या पाचजणांना दुचाकी बाजुला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. सुर्वे यांना दगड लागून हाताला मार लागला. तसेच बसची काचही फूटली होती. अशी तक्रार संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होत़ी.
संशयितांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 353,332,337,143,147,427,341 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास संगमेश्वर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपींच्यावतीने ऍड. आदेश चवंडे, विवेक दुबे, प्राजक्ता दुबे, श्रध्दा कांबळे यांनी काम पाहिले.