(राजापूर)
राजापूर तालुक्यातील करेल स्टॉप या ठिकाणी (बुधवारी) सकाळी 6 वाजता गवारेड्याचे दर्शन झालं असून यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी करेल गावातील रिक्षा व्यवसायिक राजू सागवेकर आपली रिक्षा घेऊन करेल गावा कडे जात असताना रस्त्यावरच काही फुटाच्या अंतरावर या गवा रेड्याचे दर्शन झाले. सध्या जंगल तोंडी मूळे बिबट्या, गवा अशी ही रानटी प्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. यामुळे आता धोक्याची घंटा वाजू लागली आहे. याकडे सरकारी यंत्रणा स्थानिक प्रशासन यांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे हा गवा रेडा एकटा नसून जोडी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा गवारेडा माणेशोर मंदिराच्या पाठीमागे गेला असून त्याच जंगलात वास्तव्य करत असावा असे समजते. या परिसरात नियमित होणारे वाघाचे दर्शन आणि त्यात झालेल्या गवा रेड्याचे दर्शन यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.