(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील महामार्गावरील पूल कठडा तुटल्यामुळे धोकादायक झाला आहे. वाढत्या रहदारीमुळे या पुलावर वारंवार अपघात होत असतात. दाभोळे बाजारपेठेलगत असलेला रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील पूल हा ब्रिटिशकालीन पूल आहे. गेल्या काही वर्षात वाढलेल्या रहदारीमुळे हा पूल आता वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. या पुलावर बाराचाकी, चौदाचाकी वाहनांसाठी मोठी अडचण होते.
अवजड वाहने पुलावर समोरासमोर आल्यास मोठी वाहतूक कोंडी होत असते. तसेच समोरून आलेल्या वाहनांना वाट देण्यासाठ आपले वाहन बाजूला घेण्याच्य प्रयत्नात पुलाच्या कठड्याल धडकण्याच्या घटना सातत्याने होत असतात.
असाच प्रकार गेल्या आठवड्यात घडला. चौदाचाकी ट्रक कोल्हापूरच्य दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या चालकाचा अंदाज चुकला आणि ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला होता. या धडकेत कठडा तुटून खाल नदीत पडला आहे. सध्या या ठिकाण तात्पुरता आधार करण्यात आला आहे. असे असले तरी सध्या हा पूल वाहतुकीस धोकादायक ठरत आहे.