(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी जिल्हा तायकोंडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तायकोंडो स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ दापोली आयोजित 16 वी क्युरोगी व 10 वी पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायकोंडो स्पर्धा सन 2023 सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह नवछात्रालय शिवाजी नगर दापोली या ठिकाणी दिनांक 25 ते 27 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, तालुक्यांमधून सुमारे 450खेळाडू सहभागी झाले होते.
ही स्पर्धा जिल्हा संघटना अध्यक्ष राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, जिल्हा सचिव लक्ष्मण के., जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी., पंच प्रमुख भारत कररा, कृणाल चव्हाण, दापोली तालुक्याचे अध्यक्ष स्वप्नील येलवे, उपाध्यक्ष संकेत जळगावकर सचिव गणेश पवार, कोषाध्यक्ष अनिकेत पाथरे, क्लब अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली
या स्पर्धेत मालगुंड गणपतीपुळे तायकोंडो क्लब ने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली, या स्पर्धेत खालील खेळाडूंनी सुयश संपादन केले स्पेशल कॅटेगरी फाईट प्रकार शांभवी उरूनकर -(सुवर्णपदक) सब जुनियर कॅटेगरी फाईट प्रकार चिन्मयी गोनबरे (सुवर्ण पदक ) युविका गुरव (सुवर्ण पदक)रूपम पाटिल (सुवर्ण पदक)सोहम बोरकर (सुवर्ण पदक) वेदांत बापट (सुवर्ण पदक ) स्वरीत डांगे (रौप्य पदक)श्रीयांश माने (रौप्य पदक)आराध्य उरूनकर (रौप्य पदक)ऋतुराज सुर्वे(कास्य पदक) वैयक्तिक पूमसे अरिहंत बेडक्याळे (कास्य पदक) ग्रुप पूमसे युवीका गुरव, चिन्मयी दुर्गवळी, चिन्मयी गोनबरे (तिन्ही रौप्य पदक) कॅडेट पूमसे ग्रुप मृणाली मयेकर, युविका गुरव, शर्वरी धुरी( तिन्ही रौप्य पदक)ज्युनियर पूमसे ग्रुप प्रांजल गोनबरे ,कादंबरी चौधरी, चिन्मयी गोनबरे, या यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक रुपेश तावडे यांचे मार्गर्शन लाभले.
या यशाबद्दल किशोर गुरव, राज देवरुखकर, विजय भिडे, सुयोग भिडे, श्रीदेव गणपतीपुळे चे सरपंच विनायक राऊत, रत्नागिरी जिल्हा कृषी बाजार समिती चे संचालक रोहित मयेकर, मालगुंड एजुकेशन सोसायटीचे चेअरमन बंधू मयेकर ,राम कररा ,राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विस्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कर्रा ,तसेच चंडिका मंदिर ट्रस्ट चे सचिव विनोद माने ,तसेच सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या