(रत्नागिरी /दादा जाधव)
जिल्हा शिक्षक व सेवक सहकारी पतपेढी रत्नागिरी च्यापंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही आघाडीचे पारडे जड आहे. त्यामुळे कास्ट्राईब शिक्षक संघटना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत कास्ट्राईब शिक्षक संघटना ही पतपेढी विकास आघाडीच्या पॅनल मधून लढत होती. मात्र यावर्षीचा पंचवार्षिक निवडणुकीत कस्ट्राईब्ब शिक्षक संघटना ही लोकशाही आघाडीच्या माध्यमातून लढत आहे दरम्यान यावेळी सुद्धा पंधरा शून्य असा निकाल येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एकूणच सत्तेच्या चाव्या देण्याचे काम कस्ट्राईब शिक्षक संघटना करीत असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी, कस्ट्राईब शिक्षक संघटना, चतुर्थ कर्मचारी संघटना, मुख्याध्यापक संघ, शिक्षक सेना यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या लोकशाही शिक्षक आघाडीने पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत चावी या निशाणीवर निवडणूक लढत आहे. प्रमुख संघटना मानली जाणारी टी डी एफ संघटना सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर प्रदीप वाघोदे यांच्या नेतृत्वाखाली कास्ट्राईब शिक्षक संघटना तसेच तसेच शिक्षक सेना देखील लोकशाही आघाडी पॅनल मध्ये समाविष्ट आहे.
पतपेढी विकास आघाडी डायमंड या चिन्हावर शिक्षक परिषद तसेच शिक्षक भारती,जुनिअर कॉलेज अध्यापक संघटना अफ्रोट आदी संघटना यामध्ये समाविष्ट आहेत दरम्यान आतापर्यंत सहा तालुक्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये लोकशाही आघाडी पुन्हा पतपेढीच्या चाव्या आपल्या ताब्यात घेणार आहे असे चित्र दिसू लागले आहे.
तूर्तास लोकशाही आघाडीने मंडणगड 71, दापोली 147, खेड 210 ,चिपळूण 295, गुहागर 132 तर पतपेढी विकास आघाडीने मंडणगड 41, दापोली 131, खेड 101, चिपळूण 148, गुहागर 73 अशाप्रकारे तर शिक्षण क्रांती संघटनेने 163 तसेच अपक्ष 125 अशी मते संपादन केल्याचे समजते.