(संगमेश्वर)
संगमेश्वर जवळच्या एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी वसई येथे अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दोन महिने वेगवेगळी ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सुमित संजय लोध (रा. डोंबिवली जिल्हा ठाणे) याला संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन कामेरकर, पंदेरे, टेरवणकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे मिर्या भाईंदर ठाणे येथे अटक केली होती. संगमेश्वर जवळच्या एका गावातील अल्पवयीन मुलीला सुमित संजय लोध याने फुस लावून पळवून नेले होते. संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलीस तपास करत होते. त्यानंतर तो पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता. मात्र संगमेश्वर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.