(मुंबई)
उष्णतेची तीव्रता लक्षात घेता शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शाळांना आजपासून (२१ एप्रिल) सुटी देण्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. खारघर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय उष्णाघातामुळं अनेकांना त्रास होत असल्याच्या घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळी अथवा संध्याकाळी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळं तब्बल १२ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शाळांना सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात पावलं उचलली आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या परिक्षा झाल्या असतील तर शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. त्यानंतर आता या आदेशाची लेखी प्रत शालेय विभागाला पाठवून शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचंही शिक्षणमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी वाढत्या उष्णतेमुळे मुलांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. राज्यातील ज्या शाळांची परीक्षा संपली आहे त्यांनाच सुट्टी मिळणार आहे. राज्यातील शाळांना 21 एप्रिलपासून सुट्टी सुरू होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जून पर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर केलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत आहे. तर काही ठिकाणी तापमानाने चाळीसी पार केली आहे. तसेच काही भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थिती विद्यार्थ्यांनी शाळेत जाणं त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, असं शिक्षणमंत्री केसरकर यांनी म्हटलं आहे. याबाबात केसरकर यांनी शाळांच्या परिक्षांबाबतचा अहवाल मागवला असून मे महिन्याची सुट्टी एप्रिलपासूनच जाहीर केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिल्यामुळं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.