( रत्नागिरी )
विनापरवाना देशी दारूच्या बाटल्या स्वतःकडे बाळगल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. १८) सायंकाळी शहराच्या ग्रामीण हद्दीत घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने विनापरवाना ४२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या विक्री करण्यासाठी स्वतःकडे ठेवल्या.
या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.