(कणकवली)
फोंडाघाट बिजलीनगर येथील प्रकाश नारायण गुरव (३९) याने राहत्या घराच्या मागील पडवीत लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ७.३० वा. सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.
प्रकाश हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गवांडे — सकलवाडीतील मूळ रहिवासी आहेत. सध्या ते फोंडाघाट बिजलीनगर येथे पत्नी प्राची गुरव व लहान मुलासमवेत भाड्याने राहत होते. प्रकाश हे गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी पहाटे २ ते सकाळी ७ या वेळेत त्यांनी आत्महत्या केली. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. त्यांनी अचानक अशा निर्णय घेण्याने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.