(खेड / प्रतिनिधी)
भरणे-सुकिवली मार्गावरील साई रिसॉर्टजवळ सोमवारी दुपारी 1.15 वाजण्याया सुमारास आयटेन हुंडाई कारने अचानक पेट घेतला. रणरणत्या उन्हात कारने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. स्थानिक पाणी टँकरचालक व नगरपरिषदेच्या अग्निशमक बांबाच्या सतर्कतेमुळे कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली.
याबाबत येथील नगर परिषदेच्या अग्निशमक केंद्रास कळवल्यानंतर स्थानिक पाणी टँकरचालक, न.प. अग्निशमक बंबाच्या कर्मचाऱ्यांमुळे आग आटोक्यात आल्यानंतर साऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. या आगीमुळे कोणालाही दुखापत झाली नसली तरी कारचे इंजिन जळून खाक झाले आहे.