(आरोग्य)
युरिक ॲसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ही पथ्यं युरिक ॲसिड वाढलेल्या व्यक्तीने पाळली नाहीत, तर किडनी खराब होण्याचीही शक्यता असते. ताण,तणाव, जीवनशैलीतील बदल यामुळे शरीरातील युरीक एसिडचं प्रमाण वाढतं. युरीक एसिड वाढल्यानं किडन्या, लिव्हर आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे मांसपेशीतील वेदना वाढू शकतात.
युरिक ॲसिड हे आपल्या शरीरात बनणारे एक केमिकल आहे, जे शरीरात प्यूरिन नावाच्या केमिकलच्या विघटनाने तयार होते. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले तर अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढू शकतो. म्हणूनच ते नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा युरिक ॲसिडची पातळी सामान्य स्तरापेक्षा वाढते, तेव्हा ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात जमा होते. त्यामुळे सांध्यामध्येही वेदना होतात. यासाठी काही नैसर्गिक उपाय व आहार हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
मांसाहारात मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा समावेश असतो. इतर वेळी प्रोटीन हे शरीरासाठी फायद्याचे ठरत असले, तरी यूरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी मात्र ते घातक ठरण्याची शक्यता असते. मांसाहारामध्ये प्रोटीन असल्यामुळे त्यापासून यूरिकची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असते. नॉनव्हेज खाल्ल्यामुळे किडनी डॅमेज होण्याचा धोकाही असतो. युरिक एसिड कमी करण्यासाठी अनेक औषध उपलब्ध आहेत पण युरिक एसिड कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे खाण्यापिण्यातील बदल. सगळ्यात आधी प्युरिनयुक्त खाद्यपदार्थ मासे, बिअर, रेडमीट, ब्रोकोली यांसारखे पदार्थ जास्त खाऊ नये.
प्रत्येकाच्या शरीरात यूरिक ॲसिडची निर्मिती होतच असते. मात्र याचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा अधिक वाढले, तर ती धोक्याची घंटा मानली जाते. पुरुषांमध्ये हे प्रमाण 4 ते 6.5mg/dl तर महिलांमध्ये 3.5 ते 6 mg/dl एवढे असणे अपेक्षित असते. यापेक्षा युरिक ऍसिड ची पातळी वाढली, तर ते चिंतेचे लक्षण मानले जाते.
लक्षणे
शरीरात यूरिक ॲसिड चे प्रमाण वाढले की सांध्यांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. याचे प्रमाण जसजसे वाढत जाईल तसतसा किडनी स्टोन होण्याचा धोकाही वाढतो. यापैकी कुठलेही लक्षण दिसू लागल्यानंतर तातडीने रक्ताची चाचणी करून घेणे आवश्यक असते. त्यामुळे रक्तातील यूरिक ॲसिडच्या पातळीचे वेळीच निदान होऊन, लवकर उपचार सुरू करता येणे शक्य होते.
आहार
यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात येईपर्यंत रुग्णांनी आहारात काही बदल करणे आवश्यक असते. अशावेळी नॉनव्हेज घटक आहारातून पूर्णतः काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. बहुतांश मांसाहारी पदार्थ हे युरिक ॲसिड ट्रिगर करण्याचं काम करत असतता. त्यामुळे ज्यांच्या रक्तातील युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यांना डॉक्टर मांसाहारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे इतर कुठल्याही प्रकारच्या हाय प्रोटीन पदार्थांचे सेवन न करण्याचा सल्लाही दिला जातो.
काकडीचा रस
काकडीच्या रसात लिंबू मिसळून प्यायल्यानं लिव्हर, किडनी डिटॉक्ट होण्यात मदत होते. आणि रक्तप्रवाहात यूरिक ऍसिडची पातळी कमी होते आणि किडनी डिटॉक्स करण्यास मदत होते. हे मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
गाजराचा रस
गाजराचा रस लिंबाच्या रसात मिसळून प्यायल्याने युरिक अॅसिडचे वाढलेले प्रमाण नियंत्रित केले जाऊ शकते. कारण गाजराच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, फायबर, बीटा कॅरोटीन, मिनरल्स असतात जे यूरिक ऍसिड वाढल्याने होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतात. तसेच, लिंबूमध्ये अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी असते, जे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ
वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे प्रमाण वाढवा. संत्री, लिंबू, आवळा आणि इतर लिंबूवर्गीय रसाळ फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी समृध्द पदार्थांचे सेवन केल्याने गाउटचा धोकाही कमी होतो.
गोड पदार्थ खाणे टाळा
खूप गोड पदार्थ खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढू शकते, त्यामुळे अशा गोष्टी तुमच्या आहारातून वगळल्यास बरे होईल. गोड पदार्थांमध्ये केवळ मिठाईचाच समावेश नाही, तर कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटबंद पदार्थही टाळावेत.
ॲपल सायडर व्हिनेगर
ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा ॲपल सायडर व्हिनेगरचे सेवन करा. त्याने बराच फायदा होईल.
कांदा
युरिक ऍसिड वाढल्याने सांधेदुखी, पायांना सुज, दैनंदिन कामं करण्यात अडचणी येण असे त्रास सुरू होता. कच्चा कांदा खाल्ला तर बराच फायदा होतो. कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातलं युरिक ऍसिडच कमी होत नाही तर, शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यासाठी कच्च्या कांद्याचं सॅलड बनवू शकता किंवा रिकाम्या पोटी किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता. युरिक ऍसिड नियंत्रणात येण्यासाठी मेटाबॉलिजम चांगलं असणं आवश्यक असतं. कच्चा कांदा मेटाबॉलिजम बुस्ट करण्याचं काम करतं. कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे शारीरातले घातक द्रव्य बाहेर फेकले जातात. कांदा खाण्याने वजनही नियंत्रणात येतं. कांदा शरीरातील प्युरीन प्रोटीन कमी करुन, नॉर्मल प्रोटीन वाढवतो. कांद्यात फॉलेट ऍसिड, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमीन ए,सी आणि ई असतं. शिवाय सोडिअम, पोटॅशियम भरपुर असतं. यात ऍन्टी-ऑक्सिडंट, ऍन्टी-इम्फ्लामेट्री, ऍन्टी-कार्सेनोजेनिक घटक असताना त्याने ऍसिडीटी कंट्रोलमध्ये येतं. युरिक ऍसिड वाढल्याने शरीराला येणारी सुज आणि वेदना कमी होतात.
पुरेसे पाणी प्या
जर तुमच्या शरीरातील युरिक ॲसिड जास्त असेल तर दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी सक्रिय राहते आणि शरीरातून युरिक ॲसिड बाहेर पडते.
मद्यपान टाळा
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने देखील शरीरातील युरिक ॲसिड वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवायचे असेल तर आधी दारू पिणे बंद करावे.
वजन नियंत्रणात ठेवा
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात संपूर्ण धान्य, हिरव्या पालेभाज्या आणि फळांना स्थान द्या. यामुळे वजन नियंत्रित राहते तसेच युरिक ॲसिडही नियंत्रणात राहते.