(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे नेते हारिस शेकासन यांची रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी हारीस शेकासन यांना नियुक्ती पत्र दिले व सदर नियुक्ती जाहीर केली.
हारीस शेकासन हे युवक काँग्रेस पासून पक्षात कार्यरत असून मागील अनेक वर्षे रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीवर बढती देऊन जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.