(मुंबई)
कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते व्यवस्थापित करणारी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पीएफ खात्यातील शिल्लक ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देते. नोकरदारांच्या पगारातून दर महिन्याला ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. कपात केलेल्या रकमेवर दरमहा व्याजही दिले जाते. मात्र, बर्याच वेळा आपल्याला पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागतो. आता तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक चार सोप्या मार्गांनी तपासू शकता.
EPFO वेबसाइटद्वारे
– तुम्ही EPFO वेबसाइटद्वारे तुमच्या PF खात्यातील शिल्लक तपासू शकता. येथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा UAN क्रमांक टाकावा लागेल. आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला EPFO च्या वेबसाइट epfindia.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची ईपीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी Click here to know your EPF balance या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– तिसर्या टप्प्यात तुम्हाला epfoservice.in/epfo च्या पेजवर रीडायरेक्ट केले जाईल. त्यानंतर तुम्हाला balance information पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल आणि तुमच्या राज्याच्या EPFO कार्यालयाच्या वेबसाइट लिंकवर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचा पीएफ खाते क्रमांक, नाव आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर सबमिट वर क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण होताच तुमचा पीएफ शिल्लक स्क्रीनवर दिसेल.
एसएमएसद्वारे
तुम्ही एक साधा एसएमएस पाठवून तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून EPFOHO लिहावे लागेल आणि नंतर तुमचा UAN क्रमांक टाकावा 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.
मिस कॉलद्वारे
मिस्ड कॉलद्वारे तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. या नंबरवर कॉल केल्यास तो आपोआप डिस्कनेक्ट होईल. काही सेकंदांनंतर शिल्लक तपशील तुमच्या नंबरवर पाठविला जाईल.
उमंग पोर्टलच्या माध्यमातून
तुम्ही उमंग पोर्टलद्वारे EPFO च्या सुविधा देखील वापरू शकता. यासोबतच तुम्ही याद्वारे तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक देखील तपासू शकता. उमंग अॅप गुगल प्ले, अॅप स्टोअर आणि विंडोज स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.