(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते गणपत सोनू दोरखडे यांच्या घरी श्री सत्यनारायणाची महापूजा नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. संगमेश्वर रत्नागिरी मतदारसंघाचे माजी आमदार बाळ माने हेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला.
गणपत सोनू दोरखडे उर्फ शंभू हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सहभागी असुन त्यांचा आंबेड येथे हॉटेल व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या कामातून अनेकांना जोडले आहे. तसेच मुस्लिम समाजातील लोकांमध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी या कार्यक्रमला मुस्लिम समाजातील लोकांनाही त्यांनी निमंत्रीत केले होते. त्यांच्या शब्दाला मान ठेवत पवित्र रमजान महिन्यात अनेक मुस्लिम बांधवानी या कार्यक्रमास हजेरी लावली होती. श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने महाप्रसाद, हळदी कुंकू, तसेच रात्रीच्या वेळी जागेश्वर नमन मंडळ परचुरी यांचे बहुरंगी नमनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील लोकांनी गर्दी केली होती. जागेश्वर नमन मंडळ परचुरी यांचे बहुरंगी नमनाच्या माध्यमातून कलाकारांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा परिषद सदस्य जोशी मॅडम, सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज, मनीषा दोरखडे, सुरज दोरखडे, श्रीधर दोरखडे, शेताची दोडखडे, आंबेडकर, सुहास मांयगडे, उपसरपंच शोहेब भाटकर, सलाउद्दीन बोट, खालीद बोट, अर्जुन दोरखडे, जानू दोरखंडे, सुरेश दोरखडे, तुकाराम वरक, प्राजक्ता घाणेकर, संपदा खतकर, सुवर्णा घावळी, प्रदीप भोसले, दीपक चंद्रकर, परचुरी उपसरपंच प्रतीक चंद्रकर,आदी मान्यवर उपस्थित होते