(राजापूर)
तालुक्यातील गोवळ गावात वहाळात एक बिबट्या आढळून आला होता. वनविभागाने तब्बल 24 तासापेक्षा अधिक काळ रेस्क्यु ऑपरेशन करून पिंजऱ्यात जेरबंद केले होते. हा बिबट्या सुमारे दिड वर्षे वयाच्या बिबटया मादी जातीचा होता. मात्र या बिबट्याला वैद्यकीय उपचारासाठी लांजा येथे घेवून जात असतानाच अखेर मृत्यु झाला आहे.
गेले कित्येक दिवस या बिबट्याला खाण्यास काहीच मिळत नसल्याने पुर्णपणे अशक्त झालेल्या या बिबटयाचा उपासमारीमुळे मृत्यु झाल्याचे लांजा पशुवैद्यिकय अधिकाऱ्यांनी आपल्या शवविच्छेन अहवालातून स्पष्ठ झाले आहे. याबाबतची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
बुधवार 5 एप्रिल रोजी गोवळ गावातील चौकटवाडी येथील वहाळात ठाण मांडून बिबट्या बसल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मिळताच प्रत्यक्षात अधिकारी त्याठिकाणी गेले असता वहाळात बिबट्या बसलेला दिसुन आला. तात्काळ वनविभागाने व स्थानिकांच्या मदतीने या बिबटयाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र हा जेरबंद करीत असता बिबट्या दगडाच्या कपारीत धडून बसला.पुन्हा दुसऱ्या दिवशी ( गुरूवारी) सकाळी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही तासानंतर बिबट्यास सुरक्षित रित्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे ग्रामस्थांसह वनविभागाने सुटकेचा निश्वास टाकला.
मात्र गेले काही दिवस त्याच्या पोटात काहीच अन्न न गेल्याने त्याचा उपासमारीमुळे मृत्यु झाल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे बिबट्या शरीराने अशक्त झालेल्या अवस्थेत त्याठिकाणी बसला होता. लांजा येथे वैद्यकीय उपचारासाठी घेवून जात असतानाच गुरूवारी त्याचा मुत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी लांजा यांनी शवविच्छेदन केले असुन सदर बिबट्याचा मुत्यू हा उपासमारीने झाल्याचे सांगितले. यानंतर वनविभागाच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशानुसार या मृत बिबट्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.