(मुंबई)
नव्याने अनुदानावर येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असून, त्यानुसारच या विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे.
शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना दिला जातो त्यांचे आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. तसेच आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे अनुदान मिळणार नसल्याचे सांगण्यात आला आहे. तर अनुदानास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश (School Uniform), शालेय पोषण आहार त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तक आणि इतर शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळे आधार कार्ड 30 एप्रिलपर्यंत अपडेट करणे गरजेचे आहेत.
राज्यातील अनुदानाच्या कक्षेत येणाऱ्या शाळा-महाविद्यालयात कार्यरत शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी संच मान्यता गरजेची आहे. त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना दिला जातो त्यांचे आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. अनुदान सुरू होणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. आधार अपडेट झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना अनुदान वितरीत केले जाणार आहे.
शाळा-महाविद्यालयांना किती अनुदान
20 टक्के अनुदान: वीस टक्के अनुदानाच्या कक्षेत जिल्ह्यातील दहा शाळा आहेत. इयत्ता पाचवी ते सातवीचे 20 वर्ग, तर 54 तुकड्यांना हे अनुदान मंजूर आहे.
40 टक्के अनुदान: चाळीस टक्के अनुदानाच्या कक्षेत जिल्ह्यातील नऊ शाळांचा समावेश आहे. इयत्ता पाचवी ते सातवीचे 23 वर्ग आणि 14 तुकड्यांना मान्यता देण्यात आली आहे.
60 टक्के अनुदान: साठ टक्के अनुदानाच्या कक्षेत जिल्ह्यातील 82 शाळांच्या 156 वर्ग आणि तुकड्यांचा 60 टक्के अनुदानासाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात आले.
शालेय गणवेश, शालेय पोषण आहार योजना, मोफत पाठ्यपुस्तके आणि इतर शासकीय लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता येण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे बंधनकारक केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाल्याशिवाय शाळांना अनुदान मिळणार नाही.