(खेड / प्रतिनिधी)
तालुक्यातील भरणे-भुवडवाडी व दाभिळ-जांभुळवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दारूधंद्यांवर येथील पोलिसांनी धाड टाकून 2500 रूपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरणे-भुवडवाडी येथील घराच्या पाठीमागील बाजूस विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची विकी सुरू असल्याची माहिती मिळताच येथील पोलिसांनी शुकवारी सायंकाळच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत 1624 रूपये किंमतीची दारू जप्त केली. 49 वर्षीय पौढास ताब्यात घेतले. दाभिळ-जांभुळवाडी येथेही गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीरपणे विकी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास धाड टाकली.
या धाडीत 910 रूपये किंमतीच्या मद्याच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी 61 वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल झाला आहे.