कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये अत्यावश्यक सेवेतील व्यापारी वगळता इतर व्यापाऱ्यांना जणू काही वेठीस धरल्यासारखंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा देखील समावेश होता.
यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीशा प्रमाणात कमी होताना देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेले निर्बंध जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. परंतु जिल्ह्यातील खेड तालुका वगळता इतर तालुक्यातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवहार हे सुरळीत चालू असल्याचे निदर्शनास आल्याने खेडमधील अत्यावश्यक सेवेतील व्यापारी वगळता इतर उदा. कपडे, कटलरी, कपडे, स्वीटमार्ट, चप्पल विक्री वगैरे करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दापोली मतदारसंघाचे यांची भेट घेतली व आपल्या व्यथा मांडल्या.
या व्यथा मांडत असताना एक बाब प्रखरतेने निदर्शनास आली, ती म्हणजे पोलीस प्रशासनाकडून व्यापाऱ्यांवरती नाहकपणे दुकान बंद करण्यासाठी केली जाणारी बळजबरी. सुमारे ४ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी असताना देखील दुपारपासूनच दुकान बंद करण्यासाठी दबाव आणला जात आहे. काही व्यापाऱ्यांवरती तर फौजदारी गुन्हे देखील दाखल झाले आहेत, ही बाब देखील त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी श्री. शशिकीरण काशीद यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दर्शवून उद्यापासून व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली जाईल असे मत मांडले.