मध्यप्रदेश राज्यातील इंदूरमध्ये रामनवमी दिवशी झालेल्या दुर्घटनेचा एक भयंकर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विहिरीत पडलेली महिला मृत्यूवर विजय मिळवून जवळपास सुखरुप वरती आली होती, मात्र अचानक दोरी तुटली. ही दोरी म्हणजे महिलेच्या आयुष्याचीच दोरी होती. दोरी तुटताच आधीच बेशुद्ध दिसत असलेली महिला जवळपास २० ते ३० फुटावरून पुन्हा विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढताना पथकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
गुरुवार हा अपघात झाल्यानंतर विहिरीत पडलेली महिला वर काढण्यासाठी स्थानिक लोकांनी मिळेल त्या साधनांनी मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस वफायर ब्रिगेडपथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र ना पोलीस आणि अग्निशामक दलाकडे दोरी होती. त्यानंतर महापालिकेने कशातरी दोऱ्या मिळवल्या. विहिरीत मृत्यूशी झुंजणाऱ्या लोकांना दोऱ्या पाहून जीवात जीव आला. बेशुद्ध पडलेल्या महिला व मुलांना दोरीने बांधून वरती काढले जात होते. मात्र यावेळी एक दोरी तुटली. ही दोरी अशा वेळी तुटली जेव्हा महिला जमिनीपासून केवळ ३ फूट दूर होती. महिला ४० फूट उंचीवरून पुन्हा महिला विहिरीत कोसळली.
#इंदौर #बावड़ी में समा गए बावन लोग… #36मौत, रेस्क्यू के दौरान रस्सी टूटी,फिर से 40 फिट नीचे गिरी महिला…
इसी नासमझी और लापरवाही के कारण #आर्मी को बुलाना पड़ा… pic.twitter.com/MTvNop0ox3— ATIK PATEL ® (@AZADATIQ) March 31, 2023
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ति महिलेला दोरीला बांधून तिला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मध्येच दोरी तुटते व महिलेची किंकाळी ऐकू येते तसेच ती पुन्हा विहिरीत पडते. स्थानिक लोकांनी तक्रार केली की, प्रशासनाला दुर्घटनेच्या गंभीरतेचा अंदाजच आला नाही. प्रशासनाने खूप उशीर झाल्यानंतर मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण केले.
इंदूरच्या पटेल नगर येथील मंदिरात विहिरावर बांधलेला छत कोसळून घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत ३६ भाविकांनी आपला जीव गमावला आहे. जवळपास २४ तास चाललेल्या बचाव मोहिमेत ३६ वा मृतदेह काढला गेला. शेवटचा काढलेला मृतदेह सुनील सोलंकी (५२)यांचा होता. ही दुर्घटना शहरात्या इतिहासातील आतापर्यंतची मोठी दुर्घटना आहे. या दुर्घटनेतील सध्या मृत्यूचा आकडा वाढताना दिसत आहे. आतापर्यंत विहिरीत पडून ३६ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाल्याचे समोर येत आहे.
नेमकी घटना काय?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीनिमित्ताने हवन कार्यक्रम सुरू होता. यामध्ये सामील होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. सर्व पूजा आणि आरती करत होते यादरम्यान मंदिरात असलेल्या प्राचीन विहिरीवरील छत कोसळले. ४० फूट या खोल विहिरीत चार ते पाच फूट पाणी होते. हे मंदिर सुमारे ६० वर्षे जुने आहे.