(मुंबई)
देशासह राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा डोकं वर काढले आहे. राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सध्या सर्व काही सुरळीत सुरू आहे. पण H3N2 पाठोपाठ आता कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या कोरोना रुग्णांचीही वाढ ६३ टक्क्यांनी झाली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात गुरुवारी ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३०१६ इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात कोरोनामुळे कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाला नाही. राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्के झाला आहे. आतापर्यंत राज्यात करोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या ८१,४३,६८६ इतकी झाली आहे.