(संगमेश्वर)
वडिलोपार्जित शेतजमिनीवर सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून 25 हजारांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. देवळे येथील मंडळ अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर (वय ४६, देवळे, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) आणि कानाकडी येथील तलाठी संतोष महादेव मोघे, ( ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, दोघांनीही 25 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तलाठी संतोष मोघे याने 28 रोजी मोबाईल फोनची मागणी केली होती. सदरची नोंद मंजूर करण्याकरिता मंडळ अधिकारी यांनी दिनांक 28/02/2023 व दिनांक 13/03/2023 रोजी 25,000/- रू. लाच रक्कमेची मागणी करून 25,000/- रू. लाच स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच तलाठी यालाही रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई युनिट – लाचलूचपत प्रतिबंधक विभाग – रत्नागिरी यांनी केली.
यावेळी कारवाई वेळी सापळा रचणारे पथक प्रवीण ताटे, पोलीस निरीक्षक, पोहवा/ संतोष कोळेकर, पोना/ दीपक आंबेकर, पो. शि. हेमंत पवार, पो. शि. राजेश गावकर,चापोना/प्रशांत कांबळे आदी होते. पर्यवेक्षण अधिकारी श्री. सुशांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वी. रत्नागिरी तसेच मार्गदर्शन अधिकारी मा.श्री. सुनिल लोखंडे, पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिक्षेत्र, मा.श्री.अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि., ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.