भूकंपाच्या झटक्यांची माहिती आली की भीतीने गाळण उडते. गेल्या काही वर्षात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे कितीतरी कुटुंब रस्त्यावर आली आहेत. मात्र न्यूझीलॅंडमध्ये दरवर्षी २०,००० भूकंपाचे झटके येतात. इतक्या मोठ्या प्रमाणात भूकंपाचे झटके येतात म्हणून न्यूझीलॅंडला भूकंपाचा देश म्हटले जाते. हल्लीच आलेल्या भूकंपाचे केंद्र जमिनीमध्ये १० किमी एवढे होते. यानंतर यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने केरमाडेक द्वीपाच्या क्षेत्रात ३०० किमी पर्यंत सुनामी येणार असल्याची चेतावणी दिली आहे. त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
न्यूझीलॅंडच्या जमिनीच्या आत प्रशांत क्षेत्रात आणि ऑस्ट्रेलियाच्या टेक्टिनिक प्लेट्स ओटिएरोआ मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. न्यूझीलॅंड जमिनीत असलेले टेक्नोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात. अनेकदा यांची टक्कर इतक्या जोरात होते की जमिनीत जणू स्फोट होतो. स्फोट झाल्यामुळे न्यूझीलॅंडमध्ये दरवर्षी भूकंपाचे झटके येतात.
कॅलिफोर्निया आणि न्यूझीलॅंडच्या सीमा भागात पॅसिफिक प्लेट्सचा भाग आहे. पॅसिफिक प्लेट्स घड्याळाच्या काट्यांच्या उलट दिशेला फिरतात. या प्लेट्स अमेरिकेतल्या महाद्वीप क्षेत्रातल्या प्लेट्सला टक्कर मारतात. ज्यावेळी जोरात टक्कर होते त्यावेळी भूकंप येतो. न्यूझीलॅंडमध्ये हजारोच्या संख्येत येणार्या भूकंपाचे हे भयावह वैज्ञानिक वास्तव आहे.