(डिजि टेक)
फोनमध्ये नेटवर्क नसो किंवा कमी असो, अशा परिस्थिती देखील व्हॉइस कॉल करण्याची किंवा रिसिव्ह करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी आहे तिचं नाव आहे VoWiFi म्हणजे WiFi Calling. अर्थ व्हॉइस ओव्हर वायफाय असा VoWiFi चा अर्थ आहे. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea तिन्ही दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी ही सर्व्हिस देशात रोलआउट केली आहे, त्यामुळे मोबाइल युजर खराब नेटवर्कच्या वेळी कोणत्याही अतिरिक्त चार्जविना व्हॉइस कॉल करू शकतात.
साधारणतः जेव्हा आपल्या फोनवरून एखाद्या नंबरवर कॉल केला जातो किंवा रिसिव्ह केला जातो तेव्हा सेल्युलर नेटवर्कचा वापर केला जातो. VoLTE म्हणजे व्हॉइस ओव्हर एलटीई (LTE = लॉन्ग टर्म इवोल्यूशन) पेक्षा एक पाऊल पुढील टेक्नॉलॉजी म्हणजे वायफाय कॉलिंग जिथे कॉलिंग वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून होते, यासाठी सिम नेटवर्कची गरज नाही. म्हणजे जर मोबाइलमध्ये सिग्नल नसेल तरी देखील वायफाय कनेक्शनच्या माध्यमातून कॉल कनेक्ट केला जाऊ शकतो. यासाठी टेलीकॉम सर्व्हिस अॅक्टिव्हेट असावी आणि मोबाइल फोनमध्ये वायफाय कॉलिंग सक्रिय असावं लागत.
फोनमध्ये वाय-फाय कॉलिंग अस करा सुरु
1. अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोनमध्ये VoWiFi अॅक्टिव्हेट करण्यासाठी फोनच्या सेटिंग मेन्यू मध्ये जा आणि कनेक्शनचा ऑप्शन शोधा.
2. इथे Wi-Fi calling चा ऑप्शन मिळेल, तो इनेबल करा.
3. ही सेटिंग इनेबल केल्यानंतर मोबाइल फोन एखाद्या वायफाय नेटवर्कशी कनेक्ट करा.
4. इथे VoLTE आणि VoWiFi असे दोन्ही ऑप्शन येत असतील दोन्ही ऑन करा.
5. आता आता तुम्हाला नॉर्मल कॉल करायचा असेल आणि सिग्नल वीक असेल तर फोन स्वतःहून मोबाइल नेटवर्कवरून वायफायवर स्विच करेल आणि कॉल VoWiFi वर सुरु राहील.
टीप: प्रत्येक ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये VoWiFi इनेबल करण्याचा ऑप्शन वेगवेगळा असू शकतो. यासाठी फोन सेटिंगमध्ये वायफाय कॉलिंग सर्च करा.