(रत्नागिरी)
तालुक्यातील भंडारपुळे येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या रायगड येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २७ मार्च रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. सागर देवदास शिर्के (३३, बालाजी टॉवरजवळ, सुकापूर, नवीन पनवेल, रायगड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शिर्के हा भंडारपुळे येथील समुद्र किनारी फिरण्यासाठी आला होता. यावेळी त्याला समुद्रातील पाहण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पोहताना खोल पाहण्यात गटांगळ्या खावू लागला. त्याला बेशुध्दावस्थेत स्थानिकांनी बाहेर काढले.
उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. याबाबत जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.