(जाकादेवी / वार्ताहर)
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवानिमित्त रविवार दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी, सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे सुदेश जाधव मुंबई निर्मित बुध्द भीम गीतांचा कार्यक्रम “क्रांतीची पाऊले” बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व बौध्दजन पंचायत समिती रत्नागिरी तालुका यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निधी संकलनासाठी आयोजित करण्यात आला आहे.क्रांतीची पाऊले या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ गीतांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर गेली ४० वर्षे प्रबोधन करणाऱ्या , कुंकू लावील रमान या गाण्याच्या मूळ गायिका सुषमा देवी , स्टार प्रवाहवरील सिंगींग सुपरस्टार कार्यक्रमात पहिल्या ५ मध्ये आलेला कलाकारांचा समावेश आहे.तसेच डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करणारे प्रबुद्ध जाधव, कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला ढोलकी व ढोलक वादक समन किल्लेकर, विशाल सुतार, सोनी मराठी फेम गायक आणि आदर्श शिंदे सोबत गाणारे निखील गमरे, स्नेहल गमरे, समिक्षा वाडकर, नितेश गमरे असे अनेक कलाकार क्रांतीची पाऊले या कार्यक्रमात सहभागी होऊन बुद्ध भीम गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहेत.
कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त होणा-या विविध कार्यक्रमांच्या निधी संकलनासाठी आहे. कार्यक्रमासाठी दानमूल्य रुपये २५०/-, २००/- व १५०/- असे ठेवण्यात आले आहे. यासाठी रत्नागिरीतील सर्व धम्मबांधव व आंबेडकर अनुयायी यांनी कार्यक्रमाचे दानमूल्य घेऊन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संयुक्त जयंती कार्यक्रमाचे धडाडीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, सचिव विजय मोहिते, सुहास कांबळे, तुषार जाधव, भगवान जाधव, नरेंद्र आयरे, कृष्णा जाधव, रत्नदीप कांबळे, मंगेश सावंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.