( चिपळूण )
ह्युमन राइट्स असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन हक्क संरक्षण संघटना रत्नागिरीचे वतीने चिपळूण येथे दिनांक 25 मार्च 2023 रोजी चिपळूण तालुका आढावा बैठक व नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मानवाधिकार हक्क संरक्षण असोसिएशन चे राष्ट्रीय श्री सचिव कदम व महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष श्री बाळकृष्ण वनकर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री तेजस भोपळकर जिल्हा सचिव श्री विजय आंब्रे, जिल्हा सल्लागार श्री मुराद मुकादम, जिल्हा उप तालुका अध्यक्ष श्री राजेश बोथरे, चिपळूण तालुका अध्यक्ष श्री कांता चिपळूणकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. शुभांगी जाधव मॅडम अॅड.सौ. राधा संदीप साडवीलकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांचे स्वागत चिपळूण महिला तालुका अध्यक्ष सौ. स्वाती हडकर यांनी केले.
कार्याध्यक्ष सौ.श्रुती जोशी, उपतालुका अध्यक्ष सौ. मानसी मुदलियार, सल्लागार सौ. विद्या भेकरे, शहराध्यक्ष सौ दिपाली कोलतेकर यांची मानवा धिकार हक्क संरक्षण असोसिएशनमध्ये निवड करण्यात आली. त्यांना मान्यवरांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी सामाजिक कार्यकर्त्या मानवाधिकार हक्क संरक्षण असोसिएशनचे चिपळूण तालुका अध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ मुंबई चे चिपळूण तालुका अध्यक्ष सौ.स्वाती हडकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.